बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 6:20-22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 6:20-22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घरफोडी करत नाहीत व चोरीही करत नाहीत; कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. डोळा शरीराचा दिवा आहे; ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल

सामायिक करा
मत्तय 6 MARVBSI

मत्तय 6:20-22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे निर्दोष असतील तर तुमचे संपुर्ण शरीर प्रकाशमय होईल.

सामायिक करा
मत्तय 6 IRVMAR

मत्तय 6:20-22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत. अर्थात, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. डोळा शरीराला दिव्यासारखा आहे. जर तुझी दृष्टी निर्दोष असेल, तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल

सामायिक करा
मत्तय 6 MACLBSI

मत्तय 6:20-22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पण तुमची धनसंपत्ती स्वतःसाठी स्वर्गामध्ये साठवून ठेवा. कारण तिथे तिला कसर लागत नाही व ती गंजून जात नाही, तिचा नाश होत नाही आणि चोरही ती लुटून नेत नाहीत. कारण जिथे तुमची संपत्ती आहे, तिथे तुमचे मनही असेल. “डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले, तर सर्व शरीरही प्रकाशमय होईल.

सामायिक करा
मत्तय 6 MRCV