मार्क 13:35-37
मार्क 13:35-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून जागृत राहा; कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हांला माहीत नाही; नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हांला झोपा काढत असलेले पाहील. जे मी तुम्हांला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”
मार्क 13:35-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून तुम्ही जागे असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हास माहीत नाही. जर तो अचानक आला तर तुम्हास झोपेत असताना पाहील. मी तुम्हास सांगतो, ते सर्वांना सांगतो, जागृत राहा.”
मार्क 13:35-37 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“यास्तव तुम्ही जागृत राहा कारण घराचा मालक कोणत्या दिवशी परत येईल; संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवेल त्यावेळी किंवा पहाटे येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. तो जर एकाएकी आला तर तुम्ही त्याला झोपेत असलेले सापडू नये. ‘सावध राहा!’ मी जे तुम्हाला सांगतो ते प्रत्येकाला सांगत आहे.”