मार्क 16:17-18
मार्क 16:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी ते त्यांना कदापि बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.”
मार्क 16:17-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
विश्वास धरणाऱ्यांना ही चिन्हे करता येतील:ते माझ्या नावाने भुते काढतील, नव्या भाषा बोलतील; सर्प उचलतील, ते कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना बाधा होणार नाही व त्यांनी आजाऱ्यांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”
मार्क 16:17-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि विश्वास ठेवणार्याबरोबर ही चिन्हे असतील: माझ्या नावाने ते भुते काढतील आणि नव्या भाषा बोलतील. ते सापांना आपल्या हातांनी उचलून धरतील; ते कुठलेही प्राणघातक विष प्याले तरी त्यांच्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही; ते आजार्यांवर हात ठेवतील व ते बरे होतील.”
मार्क 16:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि विश्वास धरणार्यांबरोबर ही चिन्हे असत जातील : ते माझ्या नावाने भुते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”