बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मार्क 2:1-5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मार्क 2:1-5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

काही दिवसांनी तो पुन्हा कफर्णहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारातदेखील त्यांना जागा होईना; तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षाघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना, म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षाघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

सामायिक करा
मार्क 2 MARVBSI

मार्क 2:1-5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

काही दिवसानी येशू कफर्णहूम नगरास परत आला तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही, एवढेच नव्हे तर दरवाजाबाहेरदेखील जागा नव्हती. तेव्हा तो त्यांना वचन सांगत होता. मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते. परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना, मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता, ती खाट त्यांनी छप्परातून खाली त्याच्यापुढे सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

सामायिक करा
मार्क 2 IRVMAR

मार्क 2:1-5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

काही दिवसांनी येशू पुन्हा कफर्णहूममध्ये आला. तो घरी आहे, असे लोकांच्या कानी पडले. तेथे इतके लोक जमले की, त्यांना दारातदेखील जागा होईना. तो त्यांना संदेश देत होता. त्या वेळी एका पक्षाघाती माणसाला चौघांनी उचलून त्याच्याकडे आणले. गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तेथील छप्पर त्यांनी काढले आणि जागा करून ज्या खाटेवर तो पक्षाघाती पडून होता ती त्यांनी खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “माझ्या मुला, तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे.”

सामायिक करा
मार्क 2 MACLBSI

मार्क 2:1-5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

काही दिवसानंतर, जेव्हा येशू कफर्णहूम या ठिकाणी पुन्हा आले, तेव्हा लोकांनी ऐकले की ते घरी आले आहेत. ते इतक्या मोठ्या संख्येने जमले की जागा उरली नाही, दाराबाहेरही जागा उरली नाही आणि येशूंनी वचनातून लोकांना उपदेश केला. तेवढ्यात काही लोक एका पक्षघाती मनुष्याला त्यांच्याकडे घेऊन आले, त्याला चार जणांनी उचलून आणले. आणि तिथे मोठी गर्दी असल्यामुळे ते त्या मनुष्याला येशूंजवळ घेऊन जाऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी येशू जिथे बसले होते त्या ठिकाणचे छप्पर उघडले आणि तिथून त्या मनुष्याला त्याच्या अंथरुणासहित खाली सोडले जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

सामायिक करा
मार्क 2 MRCV