नहेम्या 6:15-16
नहेम्या 6:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी यरूशलेमेच्या भिंतीचे काम बावन्न दिवसानी समाप्त झाले. हे आमच्या सर्व शत्रूंनी व आमच्या भोवतींच्या सर्व राष्ट्रांनी पाहिले तेव्हा त्यांना भीती व लाज वाटली. कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
नहेम्या 6:15-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शेवटी बावन्न दिवसांच्या अवधीत, एलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी तट बांधून तयार झाला. आमच्या शत्रूंनी व आजूबाजूच्या देशांनी याबद्दल ऐकले, तेव्हा ते घाबरले आणि त्यांचा आत्मविश्वास ढासाळला, कारण हे कार्य आमच्या परमेश्वराच्या मदतीनेच झाले आहे, याची त्यांना जाणीव झाली.
नहेम्या 6:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी म्हणजे बावन्न दिवसांच्या आत कोट बांधून झाला. आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणार्या विदेशी लोकांना भीती व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यांना दिसून आले.