नहेम्या 7:1-2
नहेम्या 7:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. आणि द्वारपाल व गायक आणि लेवी यांची नेमणूक करण्यात आली. यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरूशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे.
नहेम्या 7:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोट बांधण्याचे काम संपल्यावर मी त्याला दरवाजे बसवले आणि द्वारपाळ, गायक व लेवी ह्यांची नेमणूक केली; तेव्हा मी आपला भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्या ह्यांना यरुशलेमेचे अधिकारी नेमले; हा हनन्या इमानी असून इतर पुष्कळ लोकांहून देवाचे भय विशेष बाळगत असे.
नहेम्या 7:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तट बांधल्यावर मी वेशींना दारे लावली. द्वारपाल, संगीतकार व लेवी यांची नेमणूकही केली; मी यरुशलेमच्या शासनाची जबाबदारी माझा भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्याह यांना दिली. हनन्याह अत्यंत विश्वासू असून सर्व लोकांपेक्षा तो परमेश्वराचे भय अधिक बाळगत असे.