नहेम्या 7:3
नहेम्या 7:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी त्यांना म्हणालो, “सूर्य तापल्याशिवाय वेशीचे दरवाजे उघडू नयेत. द्वारपाल पहारा देत असताना, दरवाजे लावून त्यांना अडसर घाला. यरूशलेमामध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा, त्यापैकी काहीजणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”
नहेम्या 7:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी त्यांना सांगितले, “उन्हाचा ताप होईपर्यंत यरुशलेमेच्या वेशी उघडू नयेत, लोक काम करीत असता वेशींचे दरवाजे लावून त्यांना अडसर घालावेत, यरुशलेमकरांचे पहारे नेमावेत आणि प्रत्येकाने आपापल्या घरासमोर पहारा करावा.”
नहेम्या 7:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी त्यांना म्हणालो, “यरुशलेमच्या वेशी सूर्य बराच उष्ण होईपर्यंत उघडण्यात येऊ नयेत. पहारेकरी कामावर असतानाच, सर्व वेशींना अडसर लावून त्या बंद करण्यात याव्या. तसेच यरुशलेममधील रहिवाशांनाच पहारेकरी म्हणून नेमावे. काहीजण त्यांच्या चौकीवर तर काहींनी त्यांच्या घराजवळच्या भागाचे रक्षण करावे.”