नहेम्या 9:16-17
नहेम्या 9:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण ते आणि आमचे पूर्वज उन्मत्त होऊन ताठ मानेचे बनले आणि त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले. त्यांनी ऐकण्याचे नाकारले व तू जी आश्चर्यकारक कृत्ये त्यांच्यामध्ये केलीस त्याचा विचार त्यांनी केला नाही परंतु ते हट्टी झाले. आणि त्यांच्या बंडखोरपणामुळे त्यांनी पुन्हा गुलामगिरी पत्करण्यास एक पुढारी नेमला. पण तू क्षमाशील, दयाळू, कृपाळू, सहनशील, प्रेमळ व मंदक्रोध असा देव आहेस म्हणून तू त्यांना सोडले नाहीस.
नहेम्या 9:16-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पण ते, आमचे पूर्वज गर्विष्ठ व दुराग्रही बनले व त्यांनी तुमच्या आज्ञा पाळल्या नाही. त्यांनी तुमचे ऐकण्याचे नाकारले आणि तुम्ही त्यांच्यामध्ये केलेल्या चमत्कारांची आठवण ठेवली नाही. उलट त्यांनी बंडखोरी केली आणि परत गुलामगिरीत आपल्याला न्यावे म्हणून एक पुढारी नेमला. पण तुम्ही क्षमाशील परमेश्वर आहात, दयाळू आणि कृपाळू, मंदक्रोध व प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहात. तुम्ही त्यांचा त्याग केला नाही
नहेम्या 9:16-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तथापि त्यांनी व आमच्या पूर्वजांनी उन्मत्त होऊन आपली मान ताठ केली व तुझ्या आज्ञांचा अवमान केला; त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारले, आणि जी आश्चर्यकृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होतीस त्यांची त्यांनी पर्वा केली नाही; पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यात परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमला; पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस; तू त्यांचा त्याग केला नाहीस.