नहेम्या 9:19-21
नहेम्या 9:19-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू कृपावंत आहेस. म्हणूनच तू त्यांना वाळवंटात सोडून दिले नाहीस. दिवसा तू त्यांच्यावरुन मेघस्तंभ काढून घेतला नाहीस. तू त्यांना मार्ग दाखवत राहिलास. रात्रीही तू त्यांच्यावरचा अग्नीस्तंभ काढून टाकला नाहीस त्यांच्या पुढचा मार्ग उजळत तू त्यांना वाट दाखवीत राहिलास. त्यांना शहाणपण येण्यासाठी तू त्यांना आपला सदात्मा दिलास; त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाहीस, त्यांना तहान लागली असता पाणी दिलेस. चाळीस वर्षे तू त्यांचे वाळवंटात पालनपोषण केलेस आणि त्यांना कशाचीही उणीव भासली नाही. त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत त्यांच्या पावलांना सूज आली नाही.
नहेम्या 9:19-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुमच्या महान करुणेमुळे रानातच त्यांचा त्याग केला नाही. मेघस्तंभाने दिवसा त्यांना मार्गदर्शन केले आणि अग्निस्तंभाने रात्री प्रकाश देऊन त्यांना वाट दाखविणे थांबविले नाही. आपला चांगला आत्मा पाठवून त्यांना बोध केला. त्यांच्या मुखासाठी स्वर्गातून तुमचा मान्ना पुरविण्याचे आणि तहान भागविण्यासाठी पाणी देण्याचे तुम्ही थांबविले नाही. चाळीस वर्षापर्यंत रानात तुम्ही त्यांचे पालनपोषण केले; त्यांना कशाचीही उणीव पडू दिली नाही, त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत की त्यांचे पाय सुजले नाहीत.
नहेम्या 9:19-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तथापि तू अति दयाळू असल्याकारणाने त्यांना तू रानात सोडून दिले नाहीस; दिवसा त्यांचा मार्गदर्शक मेघस्तंभ त्यांच्यावरून ढळला नाही आणि रात्रीचा प्रकाश देऊन नीट मार्ग दाखवणारा अग्निस्तंभही ढळला नाही. त्याप्रमाणे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून तू त्यांना आपला सदात्मा दिलास; त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाहीस; आणि त्यांची तृषा शांत करण्यासाठी तू त्यांना पाणी देत राहिलास. चाळीस वर्षे जंगलात तू त्यांचे असे पालनपोषण केलेस की त्यांना कशाचीही वाण पडली नाही; त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाहीत; त्यांच्या पायांना सूज आली नाही.