बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

गणना 21:4-9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 21:4-9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला; त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, “तुम्ही आम्हांला मिसर देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.” तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले; त्यांच्या दंशाने इस्राएलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे; तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, “आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल.” मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे.

सामायिक करा
गणना 21 MARVBSI

गणना 21:4-9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले. त्यांनी मोशेविरूद्ध व देवाविरूद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, तू आम्हास या रानात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले. साप लोकांस चावले आणि बरेच इस्राएल लोक मरण पावले. लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, आम्ही तुझ्याविरूद्ध आणि परमेश्वराविरूद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हास माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक. तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो मनुष्य मरणार नाही. मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या मनुष्याने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.

सामायिक करा
गणना 21 IRVMAR

गणना 21:4-9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नंतर इस्राएली लोक होर पर्वताकडून प्रवास करीत एदोमाला वळसा घालून तांबड्या समुद्राच्या वाटेने प्रवास करीत निघाले; परंतु लोक वाटेतच अधीर झाले; ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.” तेव्हा याहवेहने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठविले; ते लोकांना चावले आणि पुष्कळ इस्राएली लोक मरण पावले. लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. तेव्हा याहवेहने मोशेला म्हटले, “सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती एका खांबावर टांग; ज्याला साप चावेल त्या व्यक्तीने खांबावर टांगलेल्या सापाकडे पाहिल्यास तो जगेल.” तेव्हा मोशेने कास्याचा साप तयार केला व तो खांबावर टांगला, तेव्हा ज्या कोणाला साप चावला व त्यांनी त्या कास्याच्या सापाकडे पाहिले म्हणजे ते जगत असत.

सामायिक करा
गणना 21 MRCV