फिलिप्पैकरांस पत्र 2:14-15
फिलिप्पैकरांस पत्र 2:14-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे काही कराल ते सर्व कुरकुर व वादविवाद न करता करा, म्हणजे, “तुम्ही या दुष्ट आणि कुटील आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे” म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्यांप्रमाणे चमकाल.
फिलिप्पैकरांस पत्र 2:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा; ह्यासाठी की, या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे; त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता.
फिलिप्पैकरांस पत्र 2:14-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा; ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता
फिलिप्पैकरांस पत्र 2:14-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जे काही तुम्ही कराल, ते कुरकुर व वादविवादाशिवाय करा. ह्यासाठी की, ह्या दुष्ट व विकृत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची मुले व्हावे. लोकांमध्ये जीवनाचे वचन सांगताना तुम्ही जगात आकाशातील ताऱ्यांसारखे दिसावे.