फिलिप्पैकरांस पत्र 3:13-14
फिलिप्पैकरांस पत्र 3:13-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बंधू व भगिनींनो, मी अजूनही ते प्राप्त केलेले असे नाही, परंतु मी एक गोष्ट करतो: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे नेटाने लक्ष लावतो. ख्रिस्त येशूंमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणासंबंधीचे पारितोषिक जिंकण्यासाठी मी त्या लक्ष्याकडे धावत आहे.
फिलिप्पैकरांस पत्र 3:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधूंनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानीत नाही पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम.
फिलिप्पैकरांस पत्र 3:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.
फिलिप्पैकरांस पत्र 3:13-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
बंधूंनो, मी अद्यापि ते माझे करून घेतले, असे मानत नाही, तर मागील गोष्टीं विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, स्वर्गीय जीवनासाठी ख्रिस्ताद्वारे मिळणारे देवाचे उच्च पाचारण हे पारितोषिक प्राप्त करून घेण्यासाठी मी लक्ष्याकडे धावतो.