नीतिसूत्रे 3:13-15
नीतिसूत्रे 3:13-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्याला ज्ञान प्राप्त होते, तो सुज्ञता संपादन करतो, तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही.
सामायिक करा
नीतिसूत्रे 3 वाचानीतिसूत्रे 3:13-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते. ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत. ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही.
सामायिक करा
नीतिसूत्रे 3 वाचा