स्तोत्रसंहिता 103:3-5
स्तोत्रसंहिता 103:3-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतात, जे तुझे सर्व रोग बरे करतात. जे नाशाच्या दरीतून तुझी सुटका करतात; आपल्या प्रीतीचा आणि दयेचा तुला मुकुट घालतात. जे तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतात; म्हणून गरुडासारखे तुझ्या तारुण्याचे नवीनीकरण होते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 103 वाचास्तोत्रसंहिता 103:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो; तो तुझे सर्व आजार बरे करतो. तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो; तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 103 वाचास्तोत्रसंहिता 103:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो; तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो; तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो; तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 103 वाचा