स्तोत्रसंहिता 106:4-5
स्तोत्रसंहिता 106:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, तू जेव्हा आपल्या लोकांवर कृपा दाखवतोस तेव्हा माझी आठवण कर; तू त्यांना जेव्हा तारशील मला मदत कर. मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा, तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन, आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन.
स्तोत्रसंहिता 106:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे याहवेह, जेव्हा तुमच्या प्रजेवर कृपादृष्टी कराल, तेव्हा माझेही स्मरण करा, त्यांचे तारण कराल, तेव्हा मलाही मदत करा. म्हणजे तुम्ही निवडलेल्यांच्या समृद्धीत मलाही वाटा मिळेल, आणि तुमच्या राष्ट्रांच्या सर्व आनंदामध्ये मीही सहभागी होईन, आणि तुमच्या वारसांसह मी देखील तुमचे स्तुतिगान करेन.
स्तोत्रसंहिता 106:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर; माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे; म्हणजे तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईन. तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करीन.