प्रकटी 13:11-12
प्रकटी 13:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी बघितले की, आणखी एक पशू भूमीतून वर येत आहे. त्यास कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती; आणि तो अजगरासारखा बोलत होता. तो पहिल्या पशूची सर्व सत्ता त्याच्यासमक्ष स्वतः चालवतो; ज्या पहिल्या पशूची जीवघेणी जखम बरी झाली होती त्यास पृथ्वीने व तीवर राहणाऱ्यांनी नमन करावे असे तो करतो.
प्रकटी 13:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले; त्याला कोकरासारखी दोन शिंगे होती; ते अजगरासारखे बोलत होते. ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्यासमक्ष चालवते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता, त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणार्या लोकांनी नमन करावे असे करते.
प्रकटी 13:11-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग मी दुसरा एक पशू पाहिला. तो पृथ्वीतून वर येत होता. त्याला कोकर्याच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, पण त्याचा आवाज अजगरासारखा होता. प्राणघातक जखम बरी झालेल्या त्या पहिल्या पशूच्या प्रतिनिधी सारखा सर्व अधिकार त्याने चालविला व सर्व जगास त्या पहिल्या पशूला नमन करविले.
प्रकटी 13:11-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोकराच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, ते अजगरासारखे बोलत होते. ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालविते आणि ज्या पहिल्या श्वापदाची प्राणघातक जखम बरी झाली होती, त्याची पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी आराधना करावी, असे ते दडपण आणते.