प्रकटी 13:14-15
प्रकटी 13:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्यास त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणाऱ्यांना फसवतो आणि ज्या पशूला तलवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणाऱ्यांस सांगतो. दुसऱ्या पशूला, पहिल्या पशूच्या मूर्तीला जीवन देण्याची परवानगी होती. म्हणजे त्या पशूच्या मूर्तीने बोलावे आणि असे करावे की, जितके लोक त्या पशूच्या मूर्तीला नमन करणार नाहीत तितक्यांना जिवे मारले जावे.
प्रकटी 13:14-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जी चिन्हे त्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणार्यांना ठकवते; म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही, जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणार्यांना ते सांगते. त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली; ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि ‘जे कोणी’ त्या श्वापदाच्या ‘मूर्तीला नमन करणार नाहीत’ ते जिवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे.
प्रकटी 13:14-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण पहिल्या पशूच्या प्रतिनिधी प्रमाणे या पशूने अद्भुत कृत्ये करून पृथ्वीवरील रहिवाशांना फसवले. तलवारीने प्राणांतिक जखम होऊनही पुन्हा जिवंत झालेल्या त्या पहिल्या पशूची मोठी मूर्ती उभारावी, असा त्याने जगातील लोकांना हुकूम केला. या पहिल्या पशूच्या मूर्तीमध्ये प्राण घालून तिला बोलण्याची शक्ती देण्याचीही दुसर्या पशूला परवानगी देण्यात आली होती. मग खुद्द त्या मूर्तीनेच हुकूम सोडला: “जो कोणी त्या पशूच्या मूर्तीला नमन करण्याचे नाकारील, त्याला ठार मारले जाईल.”
प्रकटी 13:14-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जी चिन्हे त्या पहिल्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून त्याने पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवले, म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदाची मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना त्याने फसवले. पहिल्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली होती, ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीची आराधना करणार नाहीत ते ठार मारले जावेत, असे तिने घडवून आणावे.