प्रकटी 13:16-17
प्रकटी 13:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तो असे करतो की, लहान व मोठे, धनवान व दरिद्री, स्वतंत्र व दास, अशा सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळांवर एक खूण घ्यावी, आणि ती खूण म्हणजे त्या पशूचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे, त्याच्यावाचून इतर कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकता येऊ नये.
प्रकटी 13:16-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
लहानथोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास, ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी; आणि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते श्वापद करते.
प्रकटी 13:16-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याने असेही फर्मान काढले की लहान थोर, श्रीमंत व गरीब, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर एक खूण गोंदून घ्यावी. त्या पहिल्या पशूची खूण किंवा त्याच्या नावाचा सांकेतिक आकडा कोणावर असल्याशिवाय कोणालाही विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
प्रकटी 13:16-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लहानथोर, गरीब व श्रीमंत, स्वतंत्र व दास ह्या सर्वानी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी आणि ज्याच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्याच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे दडपण त्याने सर्व लोकांवर आणले.