प्रकटी 22:18-19
प्रकटी 22:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या पुस्तकात भविष्यकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्यास मी गंभीरपणे सावधान करतोः जर कोणी ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणील; आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.
प्रकटी 22:18-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
या पुस्तकातील संदेश ऐकणार्या प्रत्येकाला मी सावध करतो: या ग्रंथपटात जे लिहिले आहे त्यात कोणी भर घातली, तर परमेश्वर त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा आणेल. तसेच जो कोणी या भविष्यकथनच्या पुस्तकात वर्णन केलेल्या वचनांतून काही काढून टाकील, परमेश्वर त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून काढून टाकील.
प्रकटी 22:18-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या पुस्तकातील ‘संदेशवचने’ ऐकणार्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील; ‘आणि’ जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही ‘काढून टाकील’ त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.3
प्रकटी 22:18-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्या पुस्तकातील संदेशवचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी योहान इशारा देऊन सांगतो की, जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. तसेच जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही काढून टाकील त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.