प्रकटी 6:5-6
प्रकटी 6:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तिसऱ्या जिवंत प्राण्याला “ये” असे म्हणतांना ऐकले तेव्हा मी काळा घोडा पाहिला आणि त्यावर जो बसलेला होता त्याच्या हातात तराजू होते. मी चार प्राण्यांच्यामधून निघालेली वाणी ऐकली, ती म्हणत होती, एका चांदीच्या नाण्याला शेरभर गहू आणि एका चांदीच्या नाण्याला तीन शेर जव. परंतु तेल व द्राक्षरस यांची हानी करू नकोस.
प्रकटी 6:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग कोकर्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा सजीव प्राणी, “ये” म्हणताना मी ऐकले. मग मी एक काळा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराच्या हातात एक तराजू होते. मग त्या चार सजीव प्राण्यांमधून निघालेली एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “एका दिवसाच्या मजुरीत एक कि.ग्रॅ. गहू आणि तीन कि.ग्रॅ. जव! आणि तेल आणि द्राक्षारस यांची नासाडी करू नका.”
प्रकटी 6:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘काळा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातात तराजू होते; आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी : “रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची हानी करू नकोस!”
प्रकटी 6:5-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मग त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसऱ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो काळा घोडा आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते. त्या वेळी जणू काही चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी: “दिवसाची मजुरी किलोभर गहू आणि दिवसाची मजुरी तीन किलो जव. मात्र ऑलिव्ह तेल व द्राक्षरस ह्यांची नासाडी करू नकोस.”