रोमकरांस पत्र 10:11-13
रोमकरांस पत्र 10:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण शास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजीत होणार नाही.’ यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्याइतका तो संपन्न आहे. कारण “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”
रोमकरांस पत्र 10:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’ यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे, ‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’
रोमकरांस पत्र 10:11-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शास्त्रलेख म्हणते, “जो कोणी प्रभू येशूंवर विश्वास ठेवितो तो कधीही लज्जित होणार नाही.” यहूदी व गैरयहूदी यामध्ये फरक नाही; त्या सर्वांचा एकच प्रभू आहे आणि जे त्यांचा धावा करतात त्या सर्वांना ते विपुल आशीर्वाद देतात, परंतु, “जो कोणी प्रभुच्या नावाने त्यांचा धावा करील तोच वाचेल.”
रोमकरांस पत्र 10:11-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण धर्मशास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही.’ यहुदी व ग्रीक ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात, त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्न आहे. ‘जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील, त्याचे तारण होईल.’