रोमकरांस पत्र 11:17-18
रोमकरांस पत्र 11:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जैतुनाचे काही फाटे जर तोडले गेले आणि तू रानटी जैतून असता, त्यामध्ये कलम करून जोडला गेलास आणि तू त्या जैतुनाच्या पौष्टीकतेच्या मुळात जर सहभागी झालास तर त्या फाट्यांविरुद्ध अभिमान मिरवू नकोस आणि जरी अभिमान मिरवलास तरी तू मुळाला उचलले नसून मुळाने तुला उचलले आहे.
रोमकरांस पत्र 11:17-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर काही फांद्या मोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही, जे रानटी जैतून, त्यांच्यामध्ये कलमरूपे लावले तर तुम्ही जैतून वृक्षाच्या मुळातून होणार्या पौष्टिकतेचे वाटेकरी झाला आहात. परंतु इतर फांद्यापेक्षा स्वतःला विशेष समजू नका. हे लक्षात ठेवा: तुम्ही मूळाला आधार देत नाही, परंतु मूळ तुम्हाला आधार देते.
रोमकरांस पत्र 11:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्यांहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नकोस. मारशील तर हे लक्षात ठेव की, तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे.
रोमकरांस पत्र 11:17-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अस्सल अशा ऑलिव्ह वृक्षाच्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू जंगली ऑलिव्ह झाडाच्या फांदीसारखा असता त्यांच्या जागी कलमरूपे जर लावला गेलास व अस्सल अशा कसदार ऑलिव्ह वृक्षाच्या मुळाचा भागीदार झालास, तर ‘त्या फांद्यांहून मी मोठा आहे,’ अशी बढाई मारू नकोस. मारशील, तर हे लक्षात ठेव की, तू केवळ एक फांदी आहेस, तू मुळाला आधार दिलेला नाही, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे.