बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 2:12-13 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 2:12-13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येतील.

रोमकरांस पत्र 2:12-13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल. कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMAR

रोमकरांस पत्र 2:12-13 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले, तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतात.

रोमकरांस पत्र 2:12-13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नियमशास्त्राशिवाय ज्या सर्वांनी पाप केले त्यांचा नाश नियमशास्त्राशिवाय होईल, आणि ज्यांनी नियमशास्त्राधीन असून पाप केले असेल त्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार केला जाईल. नियमशास्त्र केवळ ऐकणारे परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान ठरत नाहीत, परंतु जे नियमशास्त्र पाळणारे आहेत, त्यांना नीतिमान म्हणून घोषित केले जाईल.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV