रोमकरांस पत्र 2:3-4
रोमकरांस पत्र 2:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करता, पण तीच कृत्ये स्वतः करता तर, तुम्ही परमेश्वराच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते का? त्यांचा विपुल दयाळूपणा, धीर आणि सहनशीलता यांचा अवमान करून परमेश्वराची दया तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे तुला समजत नाही का?
रोमकरांस पत्र 2:3-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु माझ्या मित्रा, अशा गोष्टी करणाऱ्यांना तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस! तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाचा चांगुलपणा तुला पश्चात्ताप करायला लावणारा आहे हे न समजून तू त्याचा चांगुलपणा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?
रोमकरांस पत्र 2:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर अशा गोष्टी करणार्यांना दोष लावणार्या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय? किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?
रोमकरांस पत्र 2:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर हे मानवा, अशा गोष्टी करणार्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?