रोमकरांस पत्र 3:10-12
रोमकरांस पत्र 3:10-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही; समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.”
रोमकरांस पत्र 3:10-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
धर्मशास्त्रात असे लिहिलेले आहे: नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही. सुज्ञ कोणी नाही, देवाचा शोध झटून घेणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते सारे चुकले आहेत, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.
रोमकरांस पत्र 3:10-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही. ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही, ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.
रोमकरांस पत्र 3:10-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शास्त्रात असे लिहिलेले आहे की, “नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही; समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही; सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.”