रोमकरांस पत्र 8:38-39
रोमकरांस पत्र 8:38-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही.
रोमकरांस पत्र 8:38-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्या गोष्टी किंवा बले, किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.
रोमकरांस पत्र 8:38-39 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण माझी खात्री आहे की न मरण न जीवन, न देवदूत न भुते, न वर्तमान न भविष्यकाळ, न कोणती शक्ती, अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपला प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतिपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.
रोमकरांस पत्र 8:38-39 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, बले, वर्तमानकाळाच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी, उंची किंवा खोली, इतर कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करू शकणार नाही.