रोमकरांस पत्र 8:5-6
रोमकरांस पत्र 8:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टींवर मन ठेवतात; पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टींवर मन ठेवतात. देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती.
रोमकरांस पत्र 8:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे आपल्या शारीरिक स्वभावाला अनुसरून जीवन जगतात, त्यांची मने दैहिक गोष्टींकडे असतात, परंतु जे पवित्र आत्म्याला अनुसरून जीवन जगतात त्यांची मने आत्म्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकडे असतात. मन दैहिक असणे म्हणजे मरण आहे; पवित्र आत्म्याने नियंत्रित मनाला जीवन व शांती लाभते
रोमकरांस पत्र 8:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण जे देहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात; आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.
रोमकरांस पत्र 8:5-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जे देहानुसार आहेत, ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे पवित्र आत्म्यानुसार चालतात, ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. दैहिक गोष्टींचा ध्यास घेणे हे मरण आहे. परंतु पवित्र आत्म्याचा ध्यास घेणे हे जीवन व शांती आहे.