1
मत्तय 21:22
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल, ते सर्व तुम्हांला मिळेल.”
Porównaj
Przeglądaj मत्तय 21:22
2
मत्तय 21:21
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर ह्या झाडाला मी जे केले, ते तुम्हीही करू शकाल, इतकेच नव्हे तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’, असे म्हणाल तर तसे होईल.
Przeglądaj मत्तय 21:21
3
मत्तय 21:9
पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! दावीदपुत्राचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! ऊर्ध्वलोकी होसान्ना!”
Przeglądaj मत्तय 21:9
4
मत्तय 21:13
आणि त्यांना म्हटले, “‘माझ्या मंदिराला प्रार्थनागृह म्हणतील’, असे लिहिले आहे, पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”
Przeglądaj मत्तय 21:13
5
मत्तय 21:5
सियोनकन्येला सांगा, ‘पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो नम्र आहे म्हणून तो गाढवावर व गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’
Przeglądaj मत्तय 21:5
6
मत्तय 21:42
येशू त्यांना म्हणाला, “‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे!’, असे धर्मशास्त्रात तुम्ही कधी वाचले नाही काय?
Przeglądaj मत्तय 21:42
7
मत्तय 21:43
म्हणून मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल व त्याची फळे देणाऱ्या लोकांना ते दिले जाईल.
Przeglądaj मत्तय 21:43
Strona główna
Biblia
Plany
Nagrania wideo