1
योहान 5:24
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“मी तुम्हाला निश्चित सांगतो, जो कोणी माझे वचन ऐकतो आणि ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय होणार नाही, तर त्याने मरणातून पार होऊन जीवनात प्रवेश केला आहे.
对照
探索 योहान 5:24
2
योहान 5:6
येशूंनी त्याला तिथे पडलेले पाहिले आणि तो तसाच स्थितीत बराच काळ पडून आहे, असे जाणून त्याला विचारले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?”
探索 योहान 5:6
3
योहान 5:39-40
तुम्ही मेहनतीने शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्रलेख माझ्याबद्दल साक्ष देतात; तरी जीवनप्राप्ती साठी तुम्ही माझ्याकडे येत नाही.
探索 योहान 5:39-40
4
योहान 5:8-9
तेव्हा येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि आपले अंथरूण उचल आणि चालू लाग.” त्याच क्षणी तो मनुष्य बरा झाला आणि आपले अंथरूण उचलून चालू लागला. ज्या दिवशी हे घडले तो शब्बाथ दिवस होता.
探索 योहान 5:8-9
5
योहान 5:19
येशूंनी त्यांना असे उत्तर दिले: “मी तुम्हाला निश्चित सांगतो, पुत्राला स्वतः होऊन काही करता येत नाही; तो पित्याला जे काही करताना पाहतो, तेच तो करतो, कारण जे काही पिता करतो, तेच पुत्रही करतो.
探索 योहान 5:19
主页
圣经
计划
视频