जगभरातील सर्व मराठी भाषिकांना पवित्रशास्त्राचा संदेश स्पष्ट आणि समजण्यास योग्य बनविण्यासाठी सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करून समकालीन मराठी मध्ये पवित्रशास्त्राचे हे नवीन भाषांतर आहे. या अनुवादातील प्रत्येक वचने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित अनुभवी अनुवाद सल्लागारांनी तपासली आहेत. या प्रक्रियेत सल्लागार अनुवादित मजकुराची अचूकता स्त्रोत (हिब्रू-ग्रीक) भाषांसह स्थापित करतात आणि भाषांतर बिब्लिकाच्या भाषांतर तत्त्वज्ञानाशी सुसंगत असल्याचे सुनिश्चित करतात: मूलतः जास्तीत जास्त जवळीक आणि समकालीन वाचकांसाठी जास्तीत जास्त प्रवेशयोग्यता. स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा दोन्हीसाठी समान तंतोतंतपणा देण्याचा प्रयत्न आहे. सन्मानार्थी शब्दांचा वापर हे या अनुवादाचे वैशिष्ट्य आहे.
――――――
This is a new translation of the Bible in contemporary Marathi using all the available resources to make the message of the Bible clear and understandable to all the Marathi speakers all around the globe. Every verse in this translation has undergone the scrutiny of internationally certified experienced translation consultants. The consultants in the process have verified the accuracy of the translated text with the source (Hebrew-Greek) languages and made sure that the translation is in consistent with the translation philosophy of Biblica: Maximum proximity to the original and maximum accessibility to the contemporary readers/Equal rigor to both the original languages and the target language.
About Biblica
बिब्लिका, अंतरराष्ट्रीय बायबल सोसायटी, ही संस्था पवित्रशास्त्राचे भाषांतर आणि पवित्रशास्त्राचे प्रकाशन तसेच पवित्र शास्त्राच्या सेवेस प्रतिबद्ध आहे. अशाप्रकारे ही संस्था आफ्रीका, एशिया-पॅसिफिक, यूरोप, लॅटिन अमेरिका, मध्यपूर्व, उत्तर अमेरिका आणि दक्षिण एशिया या देशातील लोकांसाठी देवाच्या वचनांचा पुरवठा करते. सर्व जगात पसरत असलेल्या बिब्लिकाचे कार्य लोकांना देवाच्या वचनाकडे आकर्षित करते, जेणेकरून लोकांचा येशू ख्रिस्ताबरोबर नातेसंबंध येऊन त्यांचे जीवन बदलले जावे.