1
मत्तय 12:36-37
मराठी समकालीन आवृत्ती
मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे. कारण तुमच्या शब्दांवरुनच तुम्ही निर्दोष ठराल किंवा तुमच्या शब्दांवरुनच तुम्ही दोषी ठराल.”
አወዳድር
{{ጥቅስ}} ያስሱ
2
मत्तय 12:34
अहो सापांच्या पिलांनो! तुमच्यासारख्या दुष्टांना चांगले आणि यथायोग्य कसे बोलता येईल? कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच मुखातून बाहेर पडते.
3
मत्तय 12:35
चांगला मनुष्य आपल्या चांगल्या अंतःकरणातून चांगल्याच गोष्टी बाहेर काढतो, तर दुष्ट अंतःकरणाचा माणूस वाईटाने भरलेल्या साठ्यातून वाईटच बाहेर काढतो.
4
मत्तय 12:31
आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही.
5
मत्तय 12:33
“एखादे झाड त्याच्या फळांवरून तुम्हाला ओळखता येते. चांगल्या जातीचे झाड वाईट फळ देत नाही किंवा वाईट जातीचे झाड चांगले फळ देत नाही.
Home
Bible
Plans
Videos