यशायाह संदेष्ट्याच्या शब्दांच्या पुस्तकात लिहिले आहे:
“अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली,
‘प्रभूसाठी मार्ग तयार करा,
त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.
प्रत्येक दरी भरून जाईल,
प्रत्येक डोंगर आणि टेकडी समान होतील,
वाकड्या वाटा सरळ होतील,
खडतर रस्ते सुरळीत होतील.
आणि सर्व लोक परमेश्वराचे तारण पाहतील.’ ”