1
मलाखी 3:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पाहा.
Compare
Explore मलाखी 3:10
2
मलाखी 3:11-12
तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणार्यास मी तुमच्यासाठी धमकावीन; तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रे तुम्हांला धन्य म्हणतील; कारण तुमची भूमी मनोरम होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
Explore मलाखी 3:11-12
3
मलाखी 3:17-18
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणार्या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन. मग तुम्ही वळाल, आणि नीतिमान व दुष्ट ह्यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा ह्यांच्यातला भेद तुम्हांला कळेल.
Explore मलाखी 3:17-18
4
मलाखी 3:1
पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
Explore मलाखी 3:1
Home
Bible
Plans
Videos