1
मत्त. 11:28
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन.
Compare
Explore मत्त. 11:28
2
मत्त. 11:29
मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल.
Explore मत्त. 11:29
3
मत्त. 11:30
कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”
Explore मत्त. 11:30
4
मत्त. 11:27
माझ्या पित्याने मला सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही आणि पुत्रावाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
Explore मत्त. 11:27
5
मत्त. 11:4-5
येशूने उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
Explore मत्त. 11:4-5
6
मत्त. 11:15
ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.
Explore मत्त. 11:15
Home
Bible
Plans
Videos