1
रोमकरांना 3:23-24
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
कारण सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व देवाच्या वैभवास उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने एक दान म्हणून सर्व लोक ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीद्वारे देवाबरोबर नीतिमान ठरले आहेत.
Compare
Explore रोमकरांना 3:23-24
2
रोमकरांना 3:22
ही देवाची पद्धत सर्वांसाठी त्यांच्या येशू ख्रिस्तावरील श्रद्धेवर आधारित आहे. ह्या बाबतीत भेदभाव नाही
Explore रोमकरांना 3:22
3
रोमकरांना 3:25-26-25-26
त्याच्या आत्मबलिदानाद्वारे त्याने सर्वांसाठी क्षमा मिळवावी व ख्रिस्तावरील श्रद्धेने सर्वांनी ही क्षमा आपलीशी करावी म्हणून देवाने ख्रिस्त अर्पण केला. देवाने हे अशासाठी केले की, तो स्वतः नीतिमान आहे हे त्याला दाखवून द्यावयाचे होते. पूर्वी त्याने पापांकडे सहनशीलतेने व दयादृष्टीने पाहिले परंतु आता पापांच्या क्षमेसाठी तो त्याचे नीतिमत्व दाखवू इच्छितो. अशा प्रकारे तो दाखवून देतो की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात व हेच त्याचे नीतिमत्त्व आहे.
Explore रोमकरांना 3:25-26-25-26
4
रोमकरांना 3:20
नियमशास्त्रातील कृत्यांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.
Explore रोमकरांना 3:20
5
रोमकरांना 3:10-12
धर्मशास्त्रात असे लिहिलेले आहे: नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही. सुज्ञ कोणी नाही, देवाचा शोध झटून घेणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते सारे चुकले आहेत, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.
Explore रोमकरांना 3:10-12
6
रोमकरांना 3:28
कारण नियमशास्त्रातील कृत्यांवाचून मनुष्य विश्वासाने देवाबरोबरचे आपले संबंध यथोचित करू शकतो, असे आपण मानतो.
Explore रोमकरांना 3:28
7
रोमकरांना 3:4
कधीच नाही! प्रत्येक मनुष्य जरी खोटा ठरला तरीही देव खरा ठरेल! धर्मशास्त्रातही लिहिलेले आहे: तू आपल्या शद्बांत नीतिमान ठरावे आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा.
Explore रोमकरांना 3:4
Home
Bible
Plans
Videos