1
1 करिंथकरांस 2:9
मराठी समकालीन आवृत्ती
तरी शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे: “जे डोळ्यांनी पाहिले नाही, जे कानाने ऐकले नाही, माणसाच्या मनात आले नाही,” अशा सर्वगोष्टी जे लोक परमेश्वरावर प्रीती करतात त्यांच्यासाठी परमेश्वराने सिद्ध करून ठेवल्या आहेत.
Compare
Explore 1 करिंथकरांस 2:9
2
1 करिंथकरांस 2:14
परंतु जो मनुष्य आत्मिक नाही, तो परमेश्वराच्या आत्म्यापासून आलेल्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात, त्याला त्या समजणार नाहीत, कारण त्या गोष्टी परमेश्वराच्या आत्म्यानेच पारखल्या जाऊ शकतात.
Explore 1 करिंथकरांस 2:14
3
1 करिंथकरांस 2:10
परमेश्वराने आपल्याला त्यांच्या आत्म्याच्याद्वारे या गोष्टी प्रकट केल्या आहेत. कारण परमेश्वराचा आत्मा हा सर्व गोष्टींचा, परमेश्वराच्या अत्यंत गहन गोष्टींचा देखील शोध घेतो.
Explore 1 करिंथकरांस 2:10
4
1 करिंथकरांस 2:12
आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, परंतु जो आत्मा परमेश्वरापासून आहे तो मिळाला आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्याला जे विनामुल्य दिले आहे, ते आपण समजून घ्यावे.
Explore 1 करिंथकरांस 2:12
5
1 करिंथकरांस 2:4-5
माझे संदेश व उपदेश ज्ञान किंवा शहाणपणाच्या शब्दाचे नव्हते, तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रमाण देणारे असे होते. यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानांवर आधारलेला असू नये, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर असावा.
Explore 1 करिंथकरांस 2:4-5
Home
Bible
Plans
Videos