मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा. आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गीते आणि गाणी गाऊन एकमेकांशी बोला. भजन गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभुची स्तुती करा. आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना.