1
इफिसकरांस 6:12
मराठी समकालीन आवृत्ती
कारण आपले युद्ध मांस आणि रक्त यांच्याविरुद्ध नाही, तर सत्ताधारी, अधिपतींविरुद्ध, अंधकाराच्या शक्तीविरुद्ध, आणि आकाशमंडळातील दुष्ट आत्मे यांच्याविरुद्ध आहे.
Compare
Explore इफिसकरांस 6:12
2
इफिसकरांस 6:18
सर्वदा प्रार्थना करा. पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येक प्रसंगी, सर्वप्रकारच्या प्रार्थनेने आणि विनवणीने, प्रभुच्या लोकांसाठी जागृत राहून अगत्याने प्रार्थना करीत राहा.
Explore इफिसकरांस 6:18
3
इफिसकरांस 6:11
परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल.
Explore इफिसकरांस 6:11
4
इफिसकरांस 6:13
यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा.
Explore इफिसकरांस 6:13
5
इफिसकरांस 6:16-17
या सर्व व्यतिरिक्त विश्वासरूपी ढाल घ्या, जिच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे अग्निबाण विझवू शकाल. तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हेही घ्या.
Explore इफिसकरांस 6:16-17
6
इफिसकरांस 6:14-15
म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे उरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा. परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा.
Explore इफिसकरांस 6:14-15
7
इफिसकरांस 6:10
सर्वात शेवटी प्रभुच्या बळामध्ये आणि त्यांच्या पराक्रमी सामर्थ्याने सज्ज व्हा.
Explore इफिसकरांस 6:10
8
इफिसकरांस 6:2-3
“तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा” अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. “यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा.”
Explore इफिसकरांस 6:2-3
9
इफिसकरांस 6:1
मुलांनो, प्रभुमध्ये तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे.
Explore इफिसकरांस 6:1
Home
Bible
Plans
Videos