1
लुका 6:38
वऱ्हाडी नवा करार
देत जासाल तर तुमाले पण देल्या जाईन: लोकं पूर्ण माप दाबून-दाबून अन् हालवून-हालवून अन् शिग भरून तुमच्या पदरात टाकतीन, कावून कि ज्या मापान तुमी मापसान त्याचं मापान तुमच्यासाठी मापल्या जाईन.”
Compare
Explore लुका 6:38
2
लुका 6:45
एक चांगला माणूस आपल्या चांगल्या मनाच्या खज्याण्यातून चांगल्या गोष्टी काढतो, अन् बेकार माणूस आपल्या बेकार मनाच्या खज्याण्यातून बेकार गोष्टी काढते; कावून कि जे मनात भरून हाय तेच तोंडावर येते.”
Explore लुका 6:45
3
लुका 6:35
पण आपल्या शत्रूवर प्रेम करा, अन् त्यायचं चांगलं करा, अन् मंग वापस भेटलं नाई पायजे म्हणून उधार द्या; तवा तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ अशीन; अन् तुमी परमप्रधान देवाचे लेकरं होसान, कावून तो त्यायच्यावर जो धन्यवाद नाई करत, अन् बेकार लोकायवर पण कृपा करते.
Explore लुका 6:35
4
लुका 6:36
जसा तुमचा देवबाप दयाळू हाय, तसेच तुमी पण दयाळू बना.”
Explore लुका 6:36
5
लुका 6:37
“दोष नका लावू, म्हणजे तुमच्यावर पण दोष लावला जाणार नाई: कोणाले पण दोषी नका ठरवा, तवा तुमी पण दोषी ठरवल्या जाणार नाई, तुमी दुसऱ्यायले क्षमा करा तर तुमाले पण क्षमा केल्या जाईन.
Explore लुका 6:37
6
लुका 6:27-28
“पण मी तुमाले आयकणाऱ्यायले म्हणतो कि आपल्या वैऱ्यावर पण प्रेम करा, जो तुमचा द्वेष करतीन, त्यायचं चांगलं करा. जो तुमाले शाप देईन, त्याले आशीर्वाद द्या; जो तुमचा अपमान करीन, त्याच्यासाठी प्रार्थना करा.
Explore लुका 6:27-28
7
लुका 6:31
अन् जसं तुमाले वाटते कि लोकायन तुमच्या संग केलं पायजे, तुमी पण त्यायच्या सोबत तसाच व्यवहार करत जा.
Explore लुका 6:31
8
लुका 6:29-30
जो तुमच्या एका गालावर थापड मारीन, त्याच्या पुढे दुसरा पण गाल दे. अन् जो तुह्या मनिला हिसकावीन, त्याले तुह्या सदरा पण घ्याले म्हणा करू नको. अन् जो कोणी तुले मांगत अशीन त्याले द्या, अन् जो कोणी तुह्यावाली वस्तु हिसकन त्याले वापस मांगू नको.”
Explore लुका 6:29-30
9
लुका 6:43
“कोणत्याही चांगल्या झाडाले, बेकार फळ येणार नाई, अन् बेकार झाडाले, चांगलं फळ येणार नाई.
Explore लुका 6:43
10
लुका 6:44
हरएक झाड आपल्या फळापासून ओयखल्या जाते; कावून कि लोकं झुडपासून अंगुर या काटेरी झाडापासून अंजीर तोडत नाई.
Explore लुका 6:44
Home
Bible
Plans
Videos