YouVersion Logo
Search Icon

यशया 32

32
नीतिमान राजा
1पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील.
2वार्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल.
3तेव्हा पाहणार्‍यांचे डोळे मंद होणार नाहीत; ऐकणार्‍यांचे कान ऐकतील.
4उतावळ्यांच्या मनाला ज्ञानाचा उमज पडेल, तोतर्‍यांची जीभ अस्खलित व स्पष्ट बोलेल.
5मूर्खाला थोर व ठकास प्रतिष्ठित म्हणणार नाहीत.
6भ्रष्टाचार करावा, परमेश्वराविरुद्ध पाखंड सांगावे, भुकेला जीव भुकेला ठेवावा, तान्हेल्यास प्यायला काही मिळू देऊ नये म्हणून मूर्ख मूर्खतेचे भाषण करतो, त्याचे मन अधर्म करते.
7ठकाची साधनेही दुष्टतेची असतात; दीन आपल्या वाजवी हक्काचे समर्थन करीत असता ठक खोट्या शब्दांनी दुर्बलांचा नाश करण्याच्या दुष्ट युक्ती योजतो.
8पण थोर पुरुष थोर गोष्टी योजतो व थोर गोष्टींना धरून राहतो.
यरुशलेमेच्या स्त्रियांना इशारा
9अहो सुखात राहणार्‍या स्त्रियांनो, उठा, माझी वाणी ऐका; अहो निश्‍चिंत कन्यांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या.
10अहो निश्‍चिंत स्त्रियांनो, एका वर्षाहून काही दिवस अधिक तुम्ही बेचैन व्हाल; कारण द्राक्षांचा हंगाम बुडेल, फळे हाती लागणार नाहीत.
11सुखात राहणार्‍या स्त्रियांनो, थरथर कापा, निश्‍चिंत असणार्‍यांनो, घाबर्‍या व्हा, वस्त्रे फेडा, उघड्या होऊन, कंबरेस गोणपाट गुंडाळा.
12रम्य शेते व फलयुक्त द्राक्षांचे वेल नाहीत म्हणून त्या ऊर बडवतील.
13माझ्या लोकांच्या भूमीवर काटेकुसळे उगवतील; ह्या उल्लासी नगराच्या सर्व आनंदमय घरांवरही ती उगवतील.
14कारण राजभुवन ओस होईल, गजबजलेले शहर सुने पडेल; टेकडी व टेहळणीचा बुरूज ही सदासर्वदा गुहा बनतील, तेथे रानगाढवांचे क्रीडास्थान व कळपांची चरण होईल.
15आमच्यावर आत्म्याची वृष्टी वरून होईल, तोवर असे होईल, मग अरण्य बाग होईल व बागेस वन गणतील.
16तेव्हा अरण्यात न्याय्यत्व वास करील व बागेत नीतिमत्ता वसेल.
17नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल.
18आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.
19पण वनाचा नाश होतेवेळी गारा पडतील व शहर निखालस जमीनदोस्त करण्यात येईल.
20जे तुम्ही सर्व ठिकाणच्या पाण्यालगत पेरणी करता आणि बैलांना व गाढवांना मोकळेपणे फिरू देता ते तुम्ही धन्य.

Currently Selected:

यशया 32: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यशया 32