YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 146

146
परमेश्वराच्या न्याय्य कृत्यांबद्दल स्तुती
1परमेशाचे स्तवन करा!1 हे माझ्या जिवा, परमेश्वराचे स्तवन कर.
2माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन; मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.
3अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.
4त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.
5ज्याच्या साहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर आहे, तो धन्य!
6त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले; तो सदा आपले सत्यवचन पाळतो.
7तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो; भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.
8परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो; परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो.
9परमेश्वर उपर्‍यांचे रक्षण करतो; अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो; परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो.
10परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो; हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेशाचे स्तवन करा!1

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in