स्तोत्रसंहिता 20
20
विजयासाठी प्रार्थना
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको; याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो;
2पवित्रस्थानातून तो तुला साहाय्य पाठवो, सीयोनेतून तो तुला आधार देवो;
3तो तुझ्या सर्व अन्नार्पणांचे स्मरण ठेवो, तुझे होमार्पण त्याला मान्य होवो;
4तुझे मनोरथ तो पूर्ण करो, तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेवो.
5तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू; आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू; तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो.
6परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मला आता कळून आले; तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्ये करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल.
7कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात; आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू.
8ते वाकून खाली पडले आहेत; आम्ही तर उठून ताठ उभे आहोत.
9हे परमेश्वरा, तारण कर. आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 20: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.