YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 54

54
शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना
मुख्य गवयासाठी; तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दाविदाचे मस्कील (बोधपर स्तोत्र); “दावीद आमच्याजवळ लपून राहिला नाही काय?” असे जिफी लोक शौलाकडे येऊन म्हणाले तेव्हाचे.
1हे देवा, तू आपल्या नावाने मला तार; आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर;
2हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या तोंडच्या शब्दांकडे कान दे.
3कारण परकीय1 लोक माझ्यावर उठले आहेत; दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात; त्यांनी देवाकडे लक्ष लावले नाही.
4पाहा, देव माझा साहाय्यकर्ता आहे; माझ्या जिवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे.
5माझ्यावर टपून बसणार्‍यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यांना देईल; तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर.
6मी स्वसंतोषाने तुला यज्ञबली अर्पण करीन; हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन.
7कारण त्याने मला सर्व संकटांतून सोडवले आहे; माझ्या शत्रूंकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in