स्तोत्रसंहिता 6
6
अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना
मुख्य गवयासाठी; तंतुवाद्यांच्या साथीने आठव्या मंद्र स्वरावर गायचे दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस; संतापून मला शिक्षा करू नकोस.
2हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर; माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा, मला बरे कर.
3माझा जीव अगदी घाबरा झाला आहे; हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार?
4हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव, तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार;
5कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही; अधोलोकात तुझे उपकारस्मरण कोण करणार?
6मी कण्हून कण्हून थकलो आहे, रोज रात्री मी आपले अंथरूण आसवांत पोहवतो; मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो.
7शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे; माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत.
8अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
9परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे; परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करील.
10माझे सर्व वैरी फजीत होतील व फार घाबरतील; ते माघारी फिरतील, एकाएकी लज्जित होतील.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 6: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.