प्रकटी 5
5
देवाच्या कोकर्याचा साक्षात्कार
1‘जो राजासनावर बसलेला होता’ त्याच्या उजव्या हातात ‘पाठपोट लिहिलेली’ व सात शिक्के ‘मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी’ मी पाहिली;
2आणि “गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?” असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला.
3तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास समर्थ नव्हता.
4ही गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले.
5तेव्हा वडीलमंडळापैकी एक जण मला म्हणाला, “रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे.”
6तेव्हा राजासन व चार प्राणी ह्यांच्यामध्ये व वडीलमंडळ ह्यांच्यामध्ये, ज्याचा जणू काय ‘वध करण्यात’ आला होता, असा ‘कोकरा’ उभा राहिलेला मी पाहिला; त्याला सात शिंगे व ‘सात डोळे होते;’ ते ‘सर्व पृथ्वीवर’ पाठवलेले देवाचे सात आत्मे आहेत.
7त्याने जाऊन ‘राजासनावर जो बसलेला’ होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.
8त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडील कोकर्याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व ‘धूपाने’ भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या; त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या ‘प्रार्थना’ होत.
9ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात :
“तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के
फोडण्यास योग्य आहेस;
कारण तू वधला गेला होतास
आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश,
निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून
1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत
10आणि आमच्या देवासाठी त्यांना ‘राज्य’ व
‘याजक’ असे केले आहेस
आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.”
11तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्याभोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली; आणि त्यांची संख्या ‘अयुतांची अयुते व सहस्रांची सहस्रे होती.’
12ते मोठ्याने म्हणत होते :
“वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान
गौरव व धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे!”
13आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो, आणि त्यांतील सर्व वस्तुजात ह्यांना मी असे म्हणताना ऐकले :
“राजासनावर बसलेला ह्याला व कोकर्याला धन्यवाद,
सन्मान, गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत!”
14तेव्हा ते चार प्राणी म्हणाले, “आमेन!” आणि चोवीस वडिलांनी [जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला] पाया पडून नमन केले.
Currently Selected:
प्रकटी 5: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.