YouVersion Logo
Search Icon

निर्ग. 18

18
इथ्रो मोशेला सल्ला
अनु. 1:9-18
1देवाने मोशे व इस्राएल लोक यांच्यासाठी जे केले तसेच त्यांना परमेश्वराने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी मोशेचा सासरा मिद्यांनी याजक इथ्रो याने ऐकले; 2मोशेने आपली पत्नी सिप्पोरा पूर्वी परत पाठवली होती, तिला आणि तिच्या दोन पुत्रांना घेऊन मोशेचा सासरा इथ्रो आला; 3पहिल्या मुलाचे नाव गेर्षोम #अर्थ-परकाहोते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.” 4दुसऱ्या मुलाचे नाव एलियेजर #माझा देव मदतगार आहेअसे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या पित्याच्या देवाने मला मदत केली व मला फारोच्या तलवारीपासून वाचवले.” 5तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे त्याची पत्नी सिप्पोरा व त्याचे दोन पुत्र घेऊन मोशेकडे आला. 6त्याने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी पत्नी व तिचे दोन पुत्र यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.” 7तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्यास नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारल्यावर ते तंबूत गेले. 8परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, तसेच मिसराहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला परमेश्वराने त्यांना कसे वाचवले ती सर्व हकिकत मोशेने आपल्या सासऱ्याला सांगितली. 9परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसराच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांस स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला. 10इथ्रो म्हणाला, “ज्याने तुम्हास मिसऱ्यांच्या व फारोच्या हातातून सोडवले ज्याने आपल्या प्रजेला मिसऱ्यांच्या तावडीतून स्वतंत्र केले तो परमेश्वर धन्य होय. 11परमेश्वर सर्व देवांहून श्रेष्ठ आहे हे आता मला कळले. इस्राएल लोकांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानत असलेल्या मिसरी लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.” 12मग मोशेचा सासरा इथ्रो याने देवाला होमबली व यज्ञ केले. नंतर अहरोन इस्राएलाच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो यांच्याबरोबर देवासमोर जेवण करावयास आला.
न्यायनिवाडा करण्यास नायकांची नेमणूक
13दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करावयास बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेसमोर उभे होते. 14मोशे लोकांसाठी काय काय करतो ते इथ्रोने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांबरोबर जे हे करतोस ते काय आहे? तू एकटाच न्यायनिवाडा करण्यासाठी बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते का?” 15मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “देवाला प्रश्र विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात. 16लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांचा आपसांत निवाडा करतो आणि देवाचे नियम व विधी यांचे शिक्षण त्यांना देतो.” 17परंतु मोशेचा सासरा त्यास म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही. 18तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे, त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही. 19तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो, आणि देव तुला मदत करो. या लोकांचा देवाकडे तू मध्यस्थ हो आणि यांची प्रकरणे देवापाशी ने. 20तू त्यांना नियम व विधी यासंबंधी शिक्षण दे; त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे त्यांना तू समजावून सांग. 21तू लोकांमधून कर्तबगार देवाचे भय धरणारे, व विश्वासू, सत्यप्रिय, अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकांवर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम. 22या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील. 23तू असे करशील व देव तुला आज्ञा देईल तर तू टिकशील, आणि हे सर्व लोक शांतीने आपल्या ठिकाणास पोहचतील.” 24तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले. 25मोशेने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास व दहा दहांवर नायक म्हणून नेमले. 26ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकांकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकरणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे. 27मग थोड्याच दिवसानी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.

Currently Selected:

निर्ग. 18: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in