YouVersion Logo
Search Icon

निर्ग. 19

19
सीनाय पर्वताजवळ इस्त्राएल लोक येतात
1मिसरामधून प्रवासास निघाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात इस्राएल लोक सीनायच्या रानात येऊन पोहोचले. 2ते लोक रफीदिम सोडून सीनायच्या रानात आले होते; इस्राएल लोकांनी पर्वतासमोर आपला तळ दिला. 3तेव्हा मोशे पर्वत चढून देवाकडे गेला. परमेश्वराने त्यास पर्वतावरून हाक मारून सांगितले की, “तू याकोबाच्या वंशजांना हे सांग, इस्राएल लोकांस हे सांग. 4मिसऱ्यांचे मी काय केले आणि तुम्हास गरुडाच्या पंखावर उचलून घेऊन माझ्याजवळ कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. 5म्हणून मी आता तुम्हास सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे. 6तुम्ही मला, याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. तू इस्राएल लोकांस हेच सांग.” 7मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना एकत्र बोलावले; परमेश्वराने त्यास जी वचने सांगण्याची आज्ञा केली होती ती सर्व त्याने त्यांच्यापुढे सांगितली. 8आणि सर्व लोक मिळून म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेले सर्व आम्ही करू.” मोशेने परमेश्वरास लोकांचे म्हणणे सांगितले. 9आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात तुझ्याजवळ येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व लोकांस ऐकू जाईल;” त्यांचा नेहमी तुझ्यावरही विश्वास बसेल, मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वरास सांगितले. 10परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू जाऊन आज आणि उद्या लोकांस पवित्र कर; त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावेत. 11तिसऱ्या दिवशी त्यांनी तयार रहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल. 12परंतु लोकांसाठी तेथे सीमारेषा आखून लोकांनी ती ओलांडू नये, त्यांना बजावून सांग; पर्वतावर कोणीही चढू नये जो कोणी पर्वताला स्पर्श करेल तो खास आपल्या जिवाला मुकेल. 13कोणीही त्यास हात लावू नये. हात लावला तर त्यास दगडमार करावी किंवा बाणांनी विंधावे, तो पशू असो किंवा मनुष्य असो, त्यास जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घ आवाज होईल तेव्हा लोकांनी पर्वताजवळ यावे.” 14मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले. 15मग मोशे लोकांस म्हणाला, “तीन दिवस तुम्ही देवाची भेट घेण्यासाठी तयार राहा. तोपर्यंत स्त्रीस्पर्श करू नका.” 16तिसरा दिवस उजडताच मेघगर्जना झाली व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग आले आणि प्रचंड शिंगाचा फार आवाज होऊ लागला. तेव्हा छावणीत राहणारे सर्व लोक थरथर कापू लागले. 17नंतर मोशेने लोकांस छावणीतून बाहेर काढून देवाच्या दर्शनाला बाहेर आणले आणि ते पर्वताच्या तळाजवळ उभे राहिले. 18परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला, आणि सर्व पर्वत थरथरू लागला.#सर्व लोक थरथर कापू लागले 19शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्यास आपल्या वाणीने उत्तर देत गेला. 20परमेश्वराने पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला सीनाय पर्वताच्या शिखरावर बोलावले. तेव्हा तो पर्वतावर गेला. 21परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू खाली जा आणि लोकांस बजावून सांग की त्यांनी मर्यादा ओलांडून परमेश्वर काय आहे ते पाहण्यास तिकडे येऊ नये. जर ते तसे करतील तर बरेच जण मरतील. 22तसेच परमेश्वराजवळ येणाऱ्या याजकांनीही पवित्र व्हावे; नाहीतर परमेश्वर त्यांना शिक्षा करील.” 23मोशेने परमेश्वरास सांगितले, “लोक सीनाय पर्वतावर येऊ शकणार नाहीत, कारण तूच स्वत: आम्हांला मर्यादा घालून दिली व सक्त ताकीद दिली व तो अधिक पवित्र करण्यास सांगितले.” 24परमेश्वर त्यास म्हणाला, “तू खाली लोकांकडे जा व मागे येताना अहरोनाला तुझ्याबरोबर परत आण, परंतु याजक किंवा इतर लोकांस इकडे येऊ देऊ नको; ते जर माझ्याजवळ येतील तर मी त्यांना शिक्षा करीन.” 25मग मोशेने खाली जाऊन लोकांस हे सांगितले.

Currently Selected:

निर्ग. 19: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in