YouVersion Logo
Search Icon

मीखा 6

6
इस्त्राएलाशी परमेश्वराचा वाद
1आता परमेश्वर जे म्हणतो, ते ऐक.
मीखा त्यास म्हणाला,
ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड
आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत.
2पर्वतांनो व पृथ्वीच्या टिकाऊ पायांनो,
परमेश्वराचा वाद ऐका,
कारण परमेश्वरास आपल्या लोकांशी वाद करायचा आहे,
आणि तो इस्राएलाशी वाद करणार आहे.
3“माझ्या लोकांनो, मी काय केले?
मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा?
माझ्या विरुद्ध साक्ष दे.
4कारण मी मिसर देशातून तुम्हास बाहेर काढले
आणि दास्यत्वाच्या घरातून तुला सोडवीले,
मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुझ्याकडे पाठवले.
5माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याने काय योजिले होते ते आठवा
आणि बौराचा मुलगा बलाम, काय म्हणाला त्याची आठवण करा,
त्याने शिट्टीमपासून गिलगालपर्यंत#यार्देनच्या पूर्वेकडील किनाऱ्यावरील शिट्टीम येथे इस्राएल लोकांची शेवटची छावणी होती (यहोशवा 3:1), आणि पश्चिम किनाऱ्यावरील गिलगाल येथे वचनदत्त भूमीतील पहिली छावणी होती (यहोशवा 4:19). यार्देन नदीला चमत्कारिकरित्या पार करण्याची घटना या दोन छावणीच्या दरम्यान घडली (यहोशवा 3-4). येऊन त्यास कसे उत्तर दिले,
त्याचे स्मरण करा, हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायीपण तुमच्या लक्षात यावे.”
परमेश्वरास काय हवे?
6मी परमेश्वरास काय देऊ?
आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू?
मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का?
7हजार मेंढ्यांनी किंवा दहा हजार तेलाच्या नद्यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का?
माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का?
माझ्या देहाच्या पापाबद्दल माझ्या देहाचे फळ देऊ काय?
8हे मनुष्या,
चांगले ते त्याने तुला सांगितले आहे.
आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे
आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने.
यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
9परमेश्वराची वाणी नगरात घोषणा करते.
जो सुज्ञ आहे तो तुझे नाव ओळखतो,
म्हणून काठीकडे आणि ज्याने ती नेमली आहे त्याच्याकडे लक्ष द्या.
10अजूनपण वाईटाचा पैसा
आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत.
11मी असा एक मनुष्य निर्दोष असल्याचा विचार करावा का, जो दुष्टतेची तागडी आणि कपटाच्या वजनांची पिशवी बळगतो?
12त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत,
त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत.
त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते.
13म्हणून मी तुम्हास गंभीर अशा जखमांनी मारले आहे,
तुझ्या पापांमुळे मी तुझी अधोगती केली आहे.
14तू खाशील पण तृप्त होणार नाही,
तुझे रितेपण तुझ्यामध्ये राहील,
तू चांगले ते साठवून ठेवशील पण ते रक्षण होणार नाही,
आणि ज्याचे तू रक्षण करशील ते मी तलवारीला देईन.
15तू पेरशील, पण कापणी करणार नाही;
तू जैतूनांपासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील,
पण त्याचे तेल स्वत:ला लावणार नाही;
तू द्राक्ष तुडवशील, पण त्याचा रस पिणार नाही.
16कारण अम्रीचे नियम पाळले जातात
आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात.
तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता,
म्हणून मी तुझा व तुझ्या शहराचा नाश करीन व
त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल
आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल.

Currently Selected:

मीखा 6: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in