1 योहान 5
5
ख्रिस्तशिष्याची श्रद्धा
1येशू हा ख्रिस्त आहे, असा विश्वास जो कोणी धरतो, तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी पित्यावर प्रीती करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. 2आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. 3देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा फार कठीण नाहीत. 4जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर जय मिळवतो आणि जगावरील जय म्हणजेच आपली श्रद्धा. 5येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो ठेवतो, त्याच्यावाचून जगावर जय मिळविणारा कोण आहे?
6जो पाण्याने व रक्ताने आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त, केवळ पाण्याने नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. 7साक्ष देणारे तिघे आहेत: आत्मा, पाणी व रक्त. 8ह्या तिघांची साक्ष एकच आहे. 9आपण माणसाची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. देवाने आपल्या पुत्राविषयी दिली, तीच ही त्याची साक्ष आहे. 10जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या मध्येच साक्ष आहे. ज्याने देवावर विश्वास ठेवला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे, तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. 11ती साक्ष हीच आहे की, देवाने आपल्याला शाश्वत जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. 12ज्याला तो पुत्र लाभला आहे, त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही.
शाश्वत जीवन
13देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला शाश्वत जीवन लाभले आहे, हे तुम्हांला कळावे म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे. 14त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जो आत्मविश्वास वाटतो तो ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले, तर तो आपले ऐकतो. 15आपण जे काही मागतो, ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे, म्हणून जे आपण त्याच्याजवळ मागतो, ते तो आपल्याला देतो, हेही आपल्याला ठाऊक आहे.
16ज्याचा परिणाम मरण नाही, असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल, अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही, असे पाप करणाऱ्याला ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे, असेही पाप आहे आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. 17सर्व प्रकारची अनीती पापच आहे, तरीपण ज्याचा परिणाम मरण नाही, असेही पाप आहे.
18जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मलेला आहे, त्याला देवपुत्र ख्रिस्त सुरक्षित ठेवतो आणि सैतान त्याला उपद्रव करू शकत नाही.
19सगळे जग त्या दुष्टाला वश झालेले असले, तरीही आपण देवापासून आहोत, हे आपल्याला ठाऊक आहे.
20आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे, त्या परमेश्वराला ओळखण्याची समज त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबरच्या ऐक्यात आपण जीवन जगत आहोत. हाच खरा देव आहे आणि हेच खरे शाश्वत जीवन आहे.
21माझ्या मुलांनो, तुम्ही स्वतःला खोट्या दैवतांपासून दूर राखा.
Currently Selected:
1 योहान 5: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: