YouVersion Logo
Search Icon

2 योहान प्रस्तावना

प्रस्तावना
योहानचे दुसरे बोधपत्र ख्रिस्तमंडळीमधील वडीलजनांनी निवडलेल्या महिलेला व तिच्या मुलांना लिहिलेले असून ह्या संबोधनाचा अर्थ बहुधा स्थानीय ख्रिस्तमंडळी व तिचे सभासद असा असावा. ह्या छोट्याशा बोधपत्रामध्ये एकमेकांवर प्रीती करत राहण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच खोट्या धर्मशिक्षकांपासून व त्यांच्या खोट्या शिकवणीपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-3
प्रीतीची महती 1:4-6
खोट्या धर्मशिक्षणाविरुद्ध इशारा 1:7-11
समारोप 1:12-13

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in